Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आठ हजार पदांसाठी पोलिस भरती

Police Bharti 2020

गेले अनेक दिवस रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यात रिक्त असलेल्या पोलिस विभागातील जागांकरीता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना जरब बसावी म्हणून कठोर कायदा करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. अमरावती येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती: देशमुख

अनिल देशमुख यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

लोकनेते स्व.जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गृहमंत्री देशमुख म्हणाले की, पोलिस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्टनुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Atharva dhananjay karve says

    Police bharti kadhi suru honar ahe?

  2. नरेंद्र मानवेल गायकवाड says

    पोलीस भरती कधी पासून सुरु आहे

  3. MahaBharti says

    लवकरच उपलब्ध होतील.

  4. Nishant tiwari says

    pashusavardhan exam date in 2019 exam told

  5. Dnyaneshwar telang says

    Form kuthalya web site var bharayacha

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड